मुरुड तालुक्यात शिवरे गाव आहे यात गावातून सायगाव मार्गे सवत कडा वर जाता येते पावसाळ्यात हा धबधबा म्हणजे निसर्गाचे अवर्णीय व विलोभनीय असे ठिकाण आहे. तिथे निसर्गप्रेमी पर्यटक मोठ्या संख्येने आडवाटेला येतात. तिथे चारचाकी व दुचाकी गाडी या ठिकाणी सध्या जाऊ शकत नाही. पायवाटेने शेतातून आणि डोंगर आकड्यावरून निसर्ग रम्य ठिकाणी पोहोचता येते. पहिल्या पावसाचा धबधबा मोठ्या प्रमाणात वाहत असतो. याचा प्रवाह अतिशय मोठा आहे त्यामुळे शक्यतो पर्यटकांनी धबधब्याच्या समोर पाण्यात जाण्याचा प्रयत्न करू नये. मात्र हिवाळ्यात जाताना आपणास पाहता येईल हे ठिकाणी छायाचित्रणासाठी अतिशय चांगले आहे. धबधबा जरी जानेवारीपर्यंत छोट्या प्रमाणात वाहत असून येथे जाऊन स्वतः जेवण बनवून आनंद घेणे एक वेगळीच मजा आहे.
पालिका कार्यालय |
|
---|---|
पोलीस चौकी |
|
रुग्णवाहिका | |
अग्निशमन केंद्र | |
तहसील कार्यालय | |
गॅरेज | |
गाईड / ट्रॅव्हल एजन्ट |