अलिबाग वरुन मुरुडकडे येताना सिद्दी, नवाबाचा राजवाडा सोडल्यानंतर शहरात प्रवेश करताच उजव्या बाजूला 2.5 ते 3.0 कि.मी लांब व विस्तीर्ण समुद्रकिनारा ब दाट नारळ - सुपाऱ्यांच्या बागा दिसून येतात.
सदर समुद्रकिनाऱ्यावरुन पश्चिम दिशेस पद्यदुर्ग किल्ला, वायव्य दिशेस टेकडीवर नवाबाचा राजवाडा, नैक्रत्य दिशेस नानवेलचे दीपगृहाचे दर्शन होते.
राज्यातील स्वच्छ समुद्र किनाऱ्यापैकी एक असलेल्या मुरुड बीचवर विविध पक्षांचे तसेच परदेशी सिगल पक्षांचे दर्शन देखील पर्यटकांना होते. त्याचबरोबर कधीतरी डॉल्फीनचे देखील दर्शन होते.
त्याचप्रमाणे मुरुड समुद्रकिनारा हा सुरक्षित समुद्रकिनाऱ्यापैकी एक मानला जात असल्याने पर्यटकांना निश्चिपणे जलविहाराचा आनंद घेता येतो. नगरपरिषदेतर्फे जलविहार करणारे पर्यटकांचे सुरक्षिततेसाठी जीवरक्षकांची नेमणूक केलेली आहे.
समुद्रकिनारी विविध वॉटर स्पोटर्स, फेरी बोट देखील उपलब्ध आहे.
28, 29, 30 व 31 डिसेंबर रोजी समुद्रकिनारी पर्यटन महोत्सव साजरा करण्यांत येतो. या वेळेस समुद्र किनारी पर्यटकांची मोठी गर्दी असते. सदर पर्यटन महोत्सव हा रायगड जिल्हयात प्रथम मुरुड नगरपरिषदेमार्फत सुरु करण्यांत आला.
पालिका कार्यालय |
|
---|---|
पोलीस चौकी |
|
रुग्णवाहिका | |
अग्निशमन केंद्र | |
तहसील कार्यालय | |
गॅरेज | |
गाईड / ट्रॅव्हल एजन्ट |