भाषा निवडा

वेळ
7 AM - 6 PM
पसंद
493
पहिले
3662
टिप्पण्या
0 People

   

धार्मिक स्थळे

श्री गुरुदेव दत्त मंदिर

माहिती

समुद्र सपाटी पासून सुमारे ३५० ते ४०० मीटर उंचीवर 106 गुंठे जमिनीवर श्री दत्त गुरूंचे मंदीर आहे. हे मंदिर पुरातन काळापासून प्रसिद्ध असून त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या मंदिराच्या निर्मितीसाठी अनेक लहान-मोठ्या व्यक्तींचे योगदान आहे. १८०० व्या शतकाच्या मध्यास ब्रम्हेन्द्रस्वामी धावडशिकर या सिद्ध प्राप्त साधूने या टेकडीच्या माथ्यावरील सपाट मैदानात उंबराच्या झाडापाशी श्री. दत्तगुरूंच्या पवित्र पादुकांची प्रतिष्ठापना केली अशी अख्यायिका आहे. २० व्या शतकाच्या प्रारंभीक १९०६ ते १९०७ च्या सुमारास जंजिरा संस्थानाचे सरन्यायाधीश पदी असलेल्या राज्याध्यक्ष यांनी स्वखर्चाने छोटी श्री. दत्तगुरूंची मूर्ती आणून त्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना केली. सोबत मूर्तीपुढे त्यापूर्वी ब्रम्हेन्द्रस्वामीनी प्रतिष्ठापित केलेल्या श्री. दत्तगुरूंच्या पादुका आजतागायत आहेत. कालांतराने जंजिरा संस्थान खालसा झाले त्यानंतर खूप वर्ष्यानंतर रस्त्याची देखभाल होऊ शकली नाही.

श्री दत्तगुरूंचे देवस्थान मुरुड गावचे उत्तरेकडे टेकडीवर अतिशय सुंदर व अप्रतिम ठिकाण आहे. तेथून मुरुड शहरातील निसर्गरम्य अशा नारळी पोफळीच्या हिरव्यागार बागांचे दर्शन होते. श्री. सद्गुरूंच्या लहानशा मंदिरावर प्रशस्त मंदिर बांधले जावे अशी भक्तांची इच्छा होती. १९२६-२७ मध्ये दत्त मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला होता. त्यावेळी मंदिराचे सभागृह कौलारू होते जे आज देखील जपून ठेवण्यात आले आहे. सभागृहात छताला लाकडी सीलिंग होते. त्यावर दत्त मंदिरातून दिसणारा आजूबाजूच्या परिसराची चित्रे कोरण्यात अली होती. त्यावेळीचे जिर्णोद्धाराचे कार्य कै. चिंतामणी अनंत जोशी यांचा पुढाकार होता. कालांतराने अलीकडे सन 1997 मध्ये मंदिराचा पुन्हा जिर्णोद्धार करण्यात आला. त्याकरिता मंदिराच्या ट्रस्टीचे असे म्हणणे होते की मंदिराचा पाया व भिंती कायम तशाच ठेवून आरसीसी चे सभामंडप करावे. त्याकरीता चौलकर कुटुंब यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण भॊवतालचे आरसीसी काम व गाभाऱ्यातील देव्हाराचे काम स्वखर्चाने करून दिले. तसेच अलीकडे मंदिराच्या श्री. दत्तगुरूंच्या मूर्तीसाठी लाकडी देवरा तयार करण्याचे काम चौलकर कुटुंबाने खर्च करून श्री. नयन जमादार यांच्या कामगिरीतून पार पडले. १९८८ साली श्री. नरेश खोत व विलास खोत या बंधूने अगरदांडा रस्त्यापासून ते थेट मंदिरापर्यंत दगड व मुरूम यांच्या सहाय्याने रस्ता करून त्यावर डांबरीकरण केले.

सध्या अस्तित्वात असलेल्या ट्रस्टी देवळाची देखभाल तसेच सर्व धार्मिक कार्यक्रम, दत्तजयंतीला यात्रेचे आयोजन अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित रित्या करीत असत. स्थानिक व मुंबई पुणे येथून अनेक भक्तगण येत असल्याने येथे विश्वस्त मंडळ धर्मशाळा बांधायचे नियोजन सुरू आहेत.

आढावा

रेटिंग
एकूण पहिले 3662
एकूण पसंती 493
एकूण टिप्पणी 0

अधिक माहिती..

इ.स. १७५० च्या सुमारास जंजिरेकर सिद्धी चा मेव्हणा बेपत्ता झाला होता. ब्रह्मेंद्रस्वामी ज्योतिष व पत्रिकेच्या आधारे अशा व्यक्ती बाबत अचूक मार्गदर्शन करीत असतात, म्हणून सिद्दीने त्यांना बोलावणे पाठविले परंतु त्यांची परीक्षा घेण्यासाठी जंजिरा येण्यासाठी नावच उपलब्ध ठेवले नाही. स्वामीच्या लक्षात सारा प्रकार येतात त्यांनी एक केळीचे पान तोडून आणि त्यावर उभे राहून ते पाण्यावरून किल्ल्यात गेले. गणित मांडून मेव्हणा कधी परतेल याची वेळ दिवस सिद्धी ला सांगितलं. स्वामींच्या चमत्कारांनी प्रभावित झालेल्या सिद्दीने मेव्हणा परत येईपर्यंत इथेच वास्तव्य करण्याचे स्वामी न विनंती केली त्याप्रमाणे स्वामी या टेकडीवर राहिले. स्वामींनी केलेल्या भाकिताप्रमाणे मेव्हणा परतला व मुक्कामाच्या काळात स्वामींनी टेकडीवर दत्त पादुकांची स्थापना केली.

फोटो गॅलरी..



व्हिडिओ गॅलरी..

आपत्कालीन सेवा


पालिका कार्यालय
  •      02144274026
  •    Lokmanya Tilak Rd, Bhandarwada, Murud, Maharashtra 402401
पोलीस चौकी
  •       02144274033
  •    Murud Janjira, Murud - 402401
रुग्णवाहिका
अग्निशमन केंद्र
तहसील कार्यालय
गॅरेज
  •      
  •   
गाईड / ट्रॅव्हल एजन्ट
  •      
होय
सकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत उघडे
होय

वापरकर्ता टिप्पण्या (0)

तुमची प्रतिक्रिया द्या