ईदगाह हे दक्षिण आशियात वापरल्या जाणाऱ्या इस्लामिक संस्कृतीतील एक सौज्ञ आहे. सामूहिक प्रार्थनेसाठी वापरलेली जागा किंवा मैदान म्हणजे ईदगाह.
दत्त मंदिरा पासून सुमारे दीड किलोमीटर अधिक उंचीवर गेल्यास नबाब कालीन ईदगाह दिसतो. ईदगाहवरून सूर्यास्त दिसतोच, परंतु दत्त मंदिराची टेकडी या ठिकाणावरून खूप विलोभनीय भासते. आजूबाजूस जंगल व उंच डोंगर यामुळे नैसर्गिक शांतीची वेगळीच अनुभूती या परिसरात अनुभवण्यास मिळते. ईदगाह हे दक्षिण आशियात वापरल्या जाणाऱ्या इस्लामिक संस्कृतीतील एक सौज्ञ आहे सामूहिक प्रार्थनेसाठी वापरलेली जागा किंवा मैदान म्हणजे ईदगाह
दत्तमंदिराच्या रस्त्याने वाटेतील दिव्यांच्या खुणेने थोडे अधिक उंचीवर जाताना डावीकडच्या मोबाईल टावर कडे जाणारा रस्ता टाळून सरळ पुढे गेल्यावर एक लोखंडी फाटक लागते तेथून चालत या ईदगाह पाशी पोहोचता येते. धार्मिक प्रार्थनास्थळ असल्यामुळे या चौथर्यावर पादत्राणे घालून जाऊ नये. मुरुड मधील सर्वात उंच ठिकाणी असल्यामुळे मंदिराच्या ठिकाणाहून दिसणारे दृश्य अधिक उंचीवर न्याहाळता येते. येथून सर्व परिसर मोठा सुंदर दिसतो.
पालिका कार्यालय |
|
---|---|
पोलीस चौकी |
|
रुग्णवाहिका | |
अग्निशमन केंद्र | |
तहसील कार्यालय | |
गॅरेज | |
गाईड / ट्रॅव्हल एजन्ट |